गती
विस्थापन - विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदुमधील सर्वात कमी अंतर होय.
चाल - एखाद्या वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
वेग - 'एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात'.
विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणार्या बदलाचा दर म्हणजे वेग होय.
वेग = विस्थापन / वेळ
गतीविषयक समीकरणे
०१. वेग काळ संबंधी समीकरणे : v=u+at
गतीविषयक नियम
०१. जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात. आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो. गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
न्यूटनचे गतीविषयक नियम
पहिला नियम
'जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते'. यालाच 'जडत्वाचा नियम' असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
दूसरा नियम
'संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते'.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग - वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv

चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळ
SI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.
खूप जास्त अंतरासाठी km/hr हे एकक वापरतात.
SI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.
खूप जास्त अंतरासाठी km/hr हे एकक वापरतात.
वेग - 'एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात'.
विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणार्या बदलाचा दर म्हणजे वेग होय.
वेग = विस्थापन / वेळ
चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरल रेषेत असेल तर वेग आणि चाल यांचे मूल्य सारखेच असते. अन्यथा चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे.
एकरेषीय एकसमान गती - ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात.
नैकसमान गती - ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत असमान अंतर कापते, तिला नैकसमान गती म्हणतात. उदा. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची गती.
त्वरण - वेगामधील वेळेच्या संदर्भात होणार्या बदलला त्वरण म्हणतात.
त्वरण = वेग बदल / काल
a = v-u/t
v= अंतिम वेग
u= सुरवातीचा वेग
t= कालावधी

ज्यावेळी गतीच्या सुरवातीला वस्तु विराम अवस्थेत असते त्यावेळी सुरवातीचा वेग u=0
ज्यावेळी गतीच्या आखेरीस वस्तु विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग v=0
ज्यावेळी गतीच्या आखेरीस वस्तु विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग v=0
गतीविषयक समीकरणे
०१. वेग काळ संबंधी समीकरणे : v=u+at
०२. स्थिती काळ संबंधी समीकरणे : s = ut+1/2 at2
०३. स्थिती वेग संबंधी समीकरणे : v2 =u2+2as
गतीविषयक नियम
०१. जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात. आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो. गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
न्यूटनचे गतीविषयक नियम
पहिला नियम
'जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते'. यालाच 'जडत्वाचा नियम' असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
दूसरा नियम
'संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते'.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग - वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
=mv-mu/t
=m(v-u)/t
=mv-mu/t
=m(v-u)/t
तिसरा नियम
'प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात'.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

Post A Comment
No comments :