प्राण्यांचे वर्गीकरण

सृष्टी -प्राणी
उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग १ - असमपृष्ठरज्जू प्राणी
०१. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
०२. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
०३. सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
०४. प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
०५. नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
०६. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
०७. आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
०८. मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
०९. इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
१०. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

संघाचे नाव संघाची वैशिष्ट्ये
प्रोटोझोआ हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
first पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
first प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन
first उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
first अमिबा - गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात. आकार अनियमित असतो.
first प्लाझमोडीयम - अंत:पेशीय रक्तशोषी परजीव मानवाच्या पांढऱ्या पेशीत मालेरीयास कारणीभूत असतो. अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
पोरीफेरा शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
first त्यांना ऑस्टिया म्हणतात.
first Second
first Second
first Second
first Second
first Second
first Second








सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
उदा. सायकॅन , युस्पॉजिया

सिलेंटराटा
समुद्रात आढळतात.
अरिय सममित व व्दिस्तरिय
देह गुहा असते.
शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
प्रजनन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश

प्लॅटीहेल्मिन्थीस
शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.
पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक
अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.
बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.
उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

नेमॅटहेल्मिन्थीस
शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
त्यांना गोलाकृमी म्हणतात.
अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
माणसात रोगानिर्मिती करतात.
उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म

अॅनिलीडा
लांबट , दंडाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.
त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
लैंगिक प्रजनन करतात.
उदा. गांडूळ , लीच , नेरीस

आथ्रोपोडा
प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ
प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.
त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित
शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.
एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.
उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम

मोलुस्का
प्राण्यातील दुसरा मोठा संघ
बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.
हे प्राणी एकलिंगी असतात.
उदा. शंख , शिंपला , गोगलगाय

इकायानोडर्माटा
फक्त समुद्रातच आढळतात.
त्रिस्तरी , एकलिंगी
कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.
पुनरुदभवन क्षमता असते.
उदा . तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

हेमिकॉर्डाटा -
प्रामुख्याने सागरनिवासी
शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित
फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.
शरीराचे तीन भाग - सोंड , कॉलर , प्रकांड
श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.
लैंगिक प्रजनन करतात.
उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस








विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी

संघ - कॉर्डाटा

उपसंघ -

1. युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2. सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस

3. व्हर्टीब्रेटा -

· वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन

· वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू

· वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड

· वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल

· वर्ग 5- एवज - पोपट , बदक

· वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव



विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी

संघ - कॉर्डाटा

· शरीरास आधार देणारा पृष्ठरज्जू असतो.

· विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पृष्ठरज्जू असतो.

· चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस नालीसारखा पोकळ असतो.

· ह्दय अधर बाजूस असते.

उपसंघ : युरोकॉर्डाटा -

· कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी

· सागरनिवासी.

· उभयलिंगी.

· उदा. अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

सेफॅलोकॉर्डाटा -

· पृष्ठरज्जू संबध शरीराच्या लांबीइतका असतो.

· ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात.

· एकलिंगी.

· उदा. अॅम्फीऑक्सस

व्हर्टीब्रेटा -

· पृष्ठराज्जुचे रुपांतर पाठीच्या कण्यात झालेले असते.

· शीर पूर्णपणे विकसित

· मेंदू कवटीत संरक्षित

· अंत:कंकाल अस्थिमय

· 6 वर्गात विभागणी पुढीलप्रमाणे

वर्ग 1 : सायक्लोस्टोमाटा -

· जबडे विरहित चुशिमुख

· त्वचा मृदू व खवलेविरहित

· अयुग्मीत पर असतात.

· बहुतेक बाह्यपरजीवी

· उदा . पेट्रोमायझॉन , मिक्झीन

वर्ग 2 : पायसेस -

· शीतरक्ती व पाण्यात राहणारे असतात.

· शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते.

· श्वसन कल्ल्याद्वारे होते.

· डोळ्यांना पापण्या नसतात.

· असंख्य अंडी घालतात.

· उदा. डॉगफिश. रोहू

वर्ग 3 : अम्फिबिया -

· पाण्यात तसेच जमिनीवर आढळतात.

· शरीरावर खवले नसतात.

· त्वचा मृदू ,श्लेष्मल असते.

· ह्रदयाला तीन कप्पे असतात.

· एकलिंगी , अंडज असतात.

· बह्याकर्ण असतो.

· उदा. बेडूक , टोड

वर्ग 4 : रेप्टीलीया -

· सरपटणारे प्राणी

· पहिले कशेरूस्तंभ युक्त प्राणी

· त्वचा कोरडी , खवलेयुक्त असते .

· अंगुलीना नखे असतात.

· उदा. - कासव , पाल

वर्ग 5 : एवज -

· कशेरूस्तंभ युक्त प्राणी

· कोष्णरक्ती प्राणी

· पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकुलीत झालेले आहेत.

· उदा .-पोपट , बदक

· एकलिंगी , अंडज

· पोकळ हाडे असतात.

· ह्रदयाला चार कप्पे असतात.

· बह्यामुखाचे चोचीत रुपांतर झालेले असते.

· पुढच्या पायाचे पंखात रुपांतर झालेले असते.

वर्ग 6 : मॅमॅलिया -

· अतिशय उत्क्रांत

· उष्णरक्त प्राणी

· दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात.

· शरीरावर केसांचे आच्छादन असते.

· एक्लिंगी जरायुज

· प्लॅटीपस व एकीडना अंडी घालतात.

· फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात.

· ध्वनीनिर्मिती करतात.

· उदा : वटवाघूळ, खार, मानव , सिंह, माकड











Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :